MARATHI VERSION
महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेचे सदर वेब पोर्टल हे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सुलभ, पारदर्शक आणि ऑनलाइन माध्यमातून वसतिगृह प्रवेश अर्ज करण्याची सुविधा देते.
या पोर्टलद्वारे, मुंबईतील उच्च शिक्षण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज प्रक्रिया, निवड यादी, तसेच वेळापत्रक यांचा तपशील उपलब्ध करून दिला आहे.
“राज्यातील तसेच परराज्यांमधून मुंबईमधील उच्च शिक्षण विभागाच्या विविध शासकीय शैक्षणिक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना वसतिगृहांमध्ये सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत.”
मुख्य वैशिष्ट्ये:
• ऑनलाइन अर्ज प्रक्रिया: विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येईल, त्यामुळे वेळ आणि कागदपत्रांची जुळवाजुळव कमी होईल.
• निवड प्रक्रिया पारदर्शक: गुणवत्तेनुसार वसतिगृह प्रवेश दिला जातो, निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते.
• वेळापत्रक व सूचना: अर्ज करण्याची अंतिम तारीख, निवड यादी जाहीर होण्याची तारीख, प्रवेशाची अंतिम मुदत इ. सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध.
• कागदपत्रे अपलोड: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करता येईल.
• हे पोर्टल विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, सोपी व सुटसुटीत बनवते.
ENGLISH VERSION
The web portal for the Government Hostel Admission Process of the Higher Education Department, Government of Maharashtra, provides students and their parents with a convenient, transparent, and online platform to apply for hostel admissions.
Through this portal, all necessary information required for admission to government hostels under the Higher Education Department in Mumbai—such as eligibility criteria, list of required documents, application process, selection list, and schedule—is made available in detail.
“To enable students from within the state as well as from other states who are pursuing various courses in different government educational institutions under the Higher Education Department in Mumbai to easily apply for hostel accommodation, this service has been made available.”
Main Features:
• Online Application Process: Students can submit applications from home, reducing time and paperwork.
• Transparent Selection Process: Hostel admission is granted based on merit, and the selection list is published on the portal.
• Schedule and Notifications: All information such as the last date for application, date of selection list publication, and final admission deadline is available online.
• Document Upload: Required documents can be scanned and uploaded to the portal.
• This portal makes the admission process transparent, simple, and convenient for students.
|